सीसीटीव्ही दाखवले, पुरावे दिले तरी….; शिंदेंच्या मंत्र्यासमोरच पूर्णेकर कुटुंबाचे मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप

ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांना गोळ्या घालून मारण्यात आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर सांत्वनपर कुटुंबियांची भेट घेतली.

सीसीटीव्ही दाखवले, पुरावे दिले तरी….; शिंदेंच्या मंत्र्यासमोरच पूर्णेकर कुटुंबाचे मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप
pratap sarnaik purnekar family

ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर 2026 रोजी रात्री त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने ठाणे शहरात खळबळ माजली होती. त्यांच्या हत्येनंतर शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबियांनी गंभीर आरोप केले होते. पूर्णेकरांच्या मृत्युमुळे शिवसेना आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वेगवान करून पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. या सर्व घडामोडींमध्ये आज, शनिवारी शिवसेनेने मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत कुटुंबियांनी आधी का नाही आलात, इतके दिवस का लागले, असा सवाल उपस्थित केला. तर सरनाईक यांनीही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द पूर्णेकर कुटुंबियांना दिला. यावेळी पुन्हा एकदा प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूला शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचं जबाबदार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी केला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी पूर्णेकर कुटुंबाने केली आहे.

हेही वाचा : SIR वादादरम्यान निवडणूक आयोगात मोठा भूकंप! ज्ञानेश कुमार यांनी घेतला मोठा निर्णय; थेट 20 अधिकाऱ्यांच्या…

दरम्यान, तुमच्यावर अन्याय होणार नाही. या प्रकरणात राजकारण झालं, प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचं प्रत्येकाला दुःख आहे. काही लोकांनी या प्रकरणात राजकारण केले, पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत. त्यांनी माहोल असा केला की आम्ही या गोष्टी टाळत आहोत , राम सोबत परवा बोललो आजही बोललो , आम्ही पूर्णपने तुमच्या बरोबर आहोत. आरोपींना भरचौकात फाशी झाली पाहिजे. मी स्वत: वैयक्तिक सर्व वकील उभे करतो. काही जणांनी इथे येऊन राजकीय फायदा घेतला, हे तुम्हाला पण माहीत आहे. मी कौटुंबिक भावनेतून बोलत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करून घेऊ नका. 100 वेळा आम्ही फोन केल्यावर जे ठाण्यात येत नाहीत, ते राजकारण करायला ठाण्यात आले, असं म्हणत सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number