निकालाचा उहापोह…पराभवाचे विश्लेषण…अन् अंतर्गत वाद! महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांची डॅमेज कंट्रोलसाठी बैठक

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर लागलेल्या निकालामुळे महायुतीत वादाची ठिणकी पडली आहे.
sunetra pawar devendra fadnavis eknath shinde
sunetra pawar devendra fadnavis eknath shinde

मुंबई : राज्यात नुकताच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर लागलेल्या निकालामुळा महायुतीत वादाची ठिणकी पडली आहे. या निवडणुकीच्या निकालानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे २ आणि भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच काँग्रेस यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचे दोन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विधान परिषदेवर निवडणूक आले आहेत. त्यामुळे महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महायुतीच्या पराभवाला अंतर्गत वाद आणि बंडखोरी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिंकली असून महायुतीतील वाद कारणीभूत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. परिणामी या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची पुढील १-२ दिवसांत बैठक पार पडणार असल्याचे समजते.

हेही वाचा : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत नवा वाद! उमेश पाटील यांच्या नियुक्तीवर श्रीवास्तवांचा आक्षेप

महायुतीचे तीन घटक भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ही महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत विधान परिषदेतील पराभवाचे विश्लेषण, अंतर्गत वाद आणि भविष्यातील डॅमेज कंट्रोलसंदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version