“मी यांना इशारा देतो जर तुम्ही…” फडणवीसांची आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया; थेट इशारा देत म्हणाले,

दिल्ली आणि मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली.

“मी यांना इशारा देतो जर तुम्ही…” फडणवीसांची आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया; थेट इशारा देत म्हणाले,
Devendra Fadanvis

ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध दिल्ली आणि मुंबईत आंदोलनाची स्थिती चिघळत आहे. अशातच राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज हो असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत ठाकरेंच्या नेतृत्वात एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू आहे. दिल्ली आणि मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी स्पष्ट सांगतो काँग्रेस पार्टीने जे सुरू केले आहे, ते पूर्णपणे संविधान विरोधी आहे… संविधान हातात घेऊन संविधानिक संस्थांना बदनाम केले जात आहे… निवडणूक आयोग, आरबीआय, सीएजी अशा सर्व संस्था कुचकामी असल्याचे दाखवले जात आहे… लोकांना या संस्थांच्या विरोधात चिथावणी देऊन, या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही असा नरेटीव निर्माण केला जात आहे… यांना भारताचा संविधान नाकारून या देशात अति डावी सत्ता प्रस्थापित करायची आहे… भारताच्या संविधानाला नाकारण्याचा सर्वात मोठा काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने आज केला आहे… हे म्हणतात सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू, सरन्यायाधीशने आमचं ऐकून घ्यावं अशी अपेक्षा ही व्यक्त करता… मात्र, हे कोणत्या संविधानात लिहिलेले आहे की न्यायाधीशांनी यांना भेटावं ऐकून घ्यावं… सर्वोच्च न्यायालय “सेपरेशन ऑफ पॉवर” प्रमाणे वेगळा आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशीही चर्चा करता येत नाही, निवेदन स्वीकारता येत नाही. त्यांचा अधिकार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचा आहे.. मात्र जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे..”

हेही वाचा- हरीश साळवे यांचा सीजेपीवर खळबळजनक आरोप, भारताचा नेपाळ-बांगलादेश बनवण्याचा डाव अन्…

सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस
“जे संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावे, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने एखाद्या मोर्चाला सामोरे जाणं हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का??? सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांची चर्चा करून यांना सांगितले आहे की आम्हाला तुमच्याशी भेटता येणार नाही.. तुम्ही जर याचीका केली तर त्याची सुनावणी आम्ही घेऊ शकू… मात्र आता सोशल मीडियावर सरन्यायाधीशा विरोधात शिवीगाळ केली जात आहे… एका प्रकारे सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे… हे संविधान नाकारण्याचेच प्रयत्न आहे, 1975 मध्ये राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनीही संविधानात संशोधन करून मूलभूत अधिकार नाकारले होते आणि त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद केला होता… आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष केलं आणि संविधान पुन्हा प्रस्थापित केले…”

काँग्रेसचं आंदोलन मॅन्यफॅक्चर्ड घडवून आणलेले- देवेंद्र फडणवीस
“मी यांना इशारा देतो जर तुम्ही संविधानाशी खेळ केले, संविधाननाची प्रत दाखवून कितीही आंदोलन उभे केले, तरी आम्ही बाबासाहेबांचे संविधानाला हात लावू देणार नाही… जेव्हा जंतर-मंतरवर अराजकता सुरू होती… तेव्हा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट मोठ्या संख्येने येत होत्या… तेव्हा संसदीय समितीने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बोलावून चौकशी केली.. तेव्हा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मान्य केले की, आम्हाला पोस्ट बूस्ट करण्यासाठी पैसा मिळत होते.. तो पैसा परदेशी असू शकते असे ही त्यांनी मान्य केले.. काँग्रेस सातत्याने हरल्यामुळे आणि पुढे जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे ते धास्तावले आहे.. अनेक राज्यात ते असंबद्ध झाले आहे.. त्यामुळे ते कसे ही सत्तेत येऊ पाहात आहे.. आमच्या नवनाथ बन यांनी आंदोलनात लोकांना कसे जमवले जात आहे हे समोर आणले आहे.. यांचे आंदोलन मॅन्यफॅक्चर्ड घडवून आणलेले आहे…”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number