राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर केली.
बातमी अपडेट होत आहे.