मुंबईत सुनेत्रा पवारांनी भाकरी फिरवली; झिशान सिद्दीकी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Zeeshan Siddique NCP
Zeeshan Siddique NCP

राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- “शेतकऱ्यांच्या मयतावर कोणी जाऊ नये” संजय गायकवाड पुन्हा बरळले

पार्थ पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची वर्णी लागली आहे. सिद्दिकी यांच्या नियुक्तीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांना साथ दिली होती. झिशान सिद्दिकी हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यानंतरही विधानपरिषदेची उमेदवारी देताना झिशान सिद्दिकी यांना प्राधान्य देण्यात आलं होतं. आता पक्षाने मुंबईतही राष्ट्रवादीने आमदार झिशान सिद्दिकी यांना मोठी जबाबदारी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version