नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत बरेच खळबळजनक आरोप केले आहे. या संपूर्ण प्ररणामागे नेमका कोणाचा हात आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यलयात बसूनच ही संपूर्ण स्क्रिप्ट लिहिल्याचा आरोप बन यांनी केलेला आहे. या स्क्रिप्टचे खरे क्रिएटर हे संयज राऊतच असल्याचे ते म्हणाले.
‘सपनो हा सौदागर’ कोण आहे, याची चौकशी ही राज्याच्या एसआयटीने करावी, अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना उत्तर देत असताना बन म्हणाले, खिचडीत जे खातात तेच बोलत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार, हाथी चले बाजार,कुत्ते भोंके बाजार अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केलेली आहे. षड्यंत्र रचले होते, त्याचे घबाड आता उघड झालेले आहे. ऑडियो क्लिप कोणी, कोणापर्यंत आणि कशी पोहोचवली, हे लगेच तपासले पाहिजे, असेही बन म्हणाले.