महायुतीत जागावाटप होताच नवा ट्विस्ट! पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे जाताच शिंदेंचा मोठा निर्णय, महायुतीला मोठा तडा?

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले असून शिंदेनी मोठा निर्णय घेतला आहे.
Pune Teachers Constituency Election News
Pune Teachers Constituency Election News

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. अशातच पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला गेले असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. असं असताना शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मंगेश चिवटे यांना देखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुणे शिक्षक मतदार संघाची जागा जरी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असली तरी देखील मंगेश चिवटे हे आता मंगळवारी पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरताच महायुतीमध्ये मोठं बड होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत निकटवर्गीय व त्यांचे माजी osd सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम आहेत. तसेच पक्ष नाही तर अपक्ष म्हणून तरी ही लढाई लढणार असा थेट इशारा सचिन सानप यांनी दिला आहे. शिवसेनेतूनच मंगेश चिवटे व सानप दोन नावांची चर्चा आहे. तर भाजप ही पुणे शिक्षक मतदार संघासाठी ठाम आहे. सानप हे पुणे वाडिया कॉलेजला राज्यशास्त्रचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजपकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला काय?

सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगूल वाजत आहे. असं असताना वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीत झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सुपूर्द करणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे तीन जागांवरील 15 संभाव्य नावांची यादी सुपूर्द झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी प्रत्येक जागेसाठी 5 नावांचा पर्याय तर 3 जागांसाठी एकूण 15 नावांची यादी सादर होणार आहे.

दरम्यान पुणे पदवीधर, पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर भाजप लढणार असून अमरावतीची जागा शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. अखेर महायुतीच्या एकमतानुसार भाजपच पुणे शिक्षक लढणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अनेक स्थानिक इच्छुकांनी दावा ठोकला होता. आता ही जागा भाजपच्या खात्यात गेल्यामुळे मित्रपक्षांतील इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत शिवसेना व राष्ट्रवादी मधील इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version