“कथित ऑडिओ क्लिप AI Generated नाही, शिंदे- फडणवीसांनी…”; जरांगेंचा मोठा दावा

500 कोटींच्या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी गुगली टाकली आहे. अशातच भाजप आणि शिंदेसेनेकडून ही ऑडिओ क्लिप AI Generated असल्याचे आरोप केले जात आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. या क्लिपवरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. 500 कोटींच्या कथित वाटपावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी गुगली टाकली आहे. अशातच भाजप आणि शिंदेसेनेकडून ही ऑडिओ क्लिप AI Generated असल्याचे आरोप केले जात आहे. या वर जरांगे पाटील यांनी ही ऑडिओ क्लिप AI Generated नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी, मी क्लिप ऐकवण्याच्या आधीच रामदास कदम यांच्याकडे क्लिप कुठून आली? त्यांच्याकडे संपूर्ण क्लिप आहे. त्यांना ती कुणी दिली? त्यांची नावे त्यांना माहीत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. मी संपूर्ण क्लिप ऐकवली. रामदास कदम यांनी फक्त शिंदेंचीच बदनामी करणारी क्लिप कशी वाजवली? असा सवाल करतानाच शिंदेंना कोण संपवतंय? असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- सर्वात मोठी बातमी! 500 कोटींच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंचा रामदास कदमांना थेट फोन; दिले महत्त्वाचे आदेश

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाच्या मुळाशी जातील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते जर प्रकरणाच्या मुळाशी नाही गेले तर हे तुम्हीच घडवून आणल्याचा आरोप करेन. देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापना केली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीची यंत्रणा या मागे लावली पाहिजे.

चौकशी करणाऱ्यांमध्ये आयएएस आयपीएस दर्जाचे अधिकारी आणि न्यायाधीश असावेत. राजकारणाला न शिवणारी यंत्रणा चौकशीत असली पाहिजे, असं सांगतानाच आता दिल्लीच्या वाऱ्या सुरू होतील. त्यानंतर काही दिवसाने दोन्ही मिळून माझ्या मागे लागतील. पडद्यामागची चर्चा दाबण्यासाठी ते सत्तेकडेच झुकतील, असा दावाही जरांगे यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version