‘महाराष्ट्राचा नवीन पप्पू…’; रोहित पवारांवर पाचपुतेंची जहरी टीका, नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार टीका केली.

‘महाराष्ट्राचा नवीन पप्पू…’; रोहित पवारांवर पाचपुतेंची जहरी टीका, नेमकं काय म्हणाले?
Vikram Pachpute

पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार टीका केली आहे. पुण्यातील हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नसून आता “रोहित पवार नाईट्स” सुरू झाल्या आहेत, असा खोचक टोला पाचपुते यांनी लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की, आंदोलनस्थळी दिवसभर केवळ ५० ते १०० लोक दिसतात. मात्र, रात्रीच्या वेळी आंदोलन सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे राहिले नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय आंदोलन बनले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: ‘तात्काळ निलंबन नाही, पण एक आठवड्यात…’; ज्ञानेश कुमारांवरील आरोपांवर सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

‘आंदोलन की मनोरंजनाचा कार्यक्रम?’

आंदोलनस्थळी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सुरू असल्याचा दावाही पाचपुते यांनी केला. आंदोलनाच्या ठिकाणी कॉमेडियन येतात, वेगवेगळी गाणी सादर केली जातात आणि आता या आंदोलनाचे रूपांतर करमणुकीच्या कार्यक्रमात झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांऐवजी आंदोलनाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाल्याचा दावा पाचपुते यांनी केला.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आंदोलनस्थळी गेले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना ट्रोल केल्याचाही दावा विक्रम पाचपुते यांनी केला. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याऐवजी राजकीय शक्तिप्रदर्शन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘रोहित पवार फक्त फार्स करत आहेत’

विक्रम पाचपुते यांनी रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही थेट निशाणा साधला. “रोहित पवार फक्त फार्स करत आहेत. काँग्रेसमध्ये जाण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच दिल्लीतील नेतृत्वाला खूश करण्यासाठी महाराष्ट्रात नवीन ‘पप्पू’ तयार होत असल्याची बोचरी टीकाही पाचपुते यांनी केली.

हेही वाचा: शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर! राजकीय घडामोडींना वेग, पुण्यातील महायुतीच्या पेचावर तोडगा निघणार?

दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनाला विद्यार्थी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत असताना भाजपकडून करण्यात आलेल्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. पाचपुते यांच्या आरोपांवर रोहित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number