जेफ्री एपस्टिनसोबत केंद्रीय मंत्र्यांचा फोटो कशासाठी? राऊतांचा खळबळजनक सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेफ्री एपस्टिन आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा फोटो पोस्ट केला आहे.
jeffrey epstein hardeep puri
jeffrey epstein hardeep puri

मुंबई :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या खास शैलीत नेहमीच भाजप सरकारवर टीक करताना दिसतात. मात्र आता त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक्स हँडलवर एक फोटो पोस्ट केला असून यामुळे केंद्रीय सरकारमध्ये खळबळ माजण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिन फाईल्समुळे चर्चेत आलेल्या जेफ्री एपस्टिनसोबतचा एक फोटो राऊतांनी शेअर केला आहे. मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिनसोबतचा मिटिंग करत असतानाचा हा फोटो असून पुरी यांचे एपस्टिन यांच्यासोबत संबंध होते, हे आता स्पष्ट झालं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. रिजिम चेंजमध्ये एपस्टिन फाईलचाही मोठा सहभाग असणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी! उमेदवार सतीश चव्हाण यांच्या जाहिरातीतून अब्दुल सत्तार गायब; मविआतील उमेदवाराच्या प्रचारामुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version