मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या खास शैलीत नेहमीच भाजप सरकारवर टीक करताना दिसतात. मात्र आता त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक्स हँडलवर एक फोटो पोस्ट केला असून यामुळे केंद्रीय सरकारमध्ये खळबळ माजण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिन फाईल्समुळे चर्चेत आलेल्या जेफ्री एपस्टिनसोबतचा एक फोटो राऊतांनी शेअर केला आहे. मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिनसोबतचा मिटिंग करत असतानाचा हा फोटो असून पुरी यांचे एपस्टिन यांच्यासोबत संबंध होते, हे आता स्पष्ट झालं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. रिजिम चेंजमध्ये एपस्टिन फाईलचाही मोठा सहभाग असणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
मोदीजी एक मंत्री हरदीप पुरी जेफ्री एपस्टीन को अकेलेमे मिल रहे है? किसका संदेश लेकर मिले? ये शुरुवात है, आगे आगे देखो क्या होने जा रहा है? @RSSorg रेजीम चेंज होगा! जय हिंद! https://t.co/1Cotkxzbhq — Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2026
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर