“फडणवीसांचा फोन आला अन्…”, पुणे पदवीधर निवडणुकीबाबत शिंदेसेनेचा मोठा निर्णय; शंभूराज देसाईंनी सर्व सांगितलं

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यात पार पडला. या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai

प्रकाश शिंदे सातारा| पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यात पार पडला. या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.

हेही वाचा- महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी! उमेदवार सतीश चव्हाण यांच्या जाहिरातीतून अब्दुल सत्तार गायब; मविआतील उमेदवाराच्या प्रचारामुळे चर्चांना उधाण

यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा मेळावा घेण्यास सांगितले होते. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाची माहिती शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनीही महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार स्मिताताई जाधव यांना पाठिंबा देण्याच्या सूचना केल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version