राकेश रामटेके, प्रतिनिधी
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. पक्षातील तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. गोंदिया येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पक्षात प्रवेश केल्यानंतर आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटनेच्या बळकटीसाठी योगदान द्यावे, असे पटेल यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.