राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! शरद पवार गटाची साथ सोडली; तीन नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात सामील

शरद पवार गटातील तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! शरद पवार गटाची साथ सोडली; तीन नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात सामील
Sharad pawar vs sunetra pawar

राकेश रामटेके, प्रतिनिधी 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. पक्षातील तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. गोंदिया येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पक्षात प्रवेश केल्यानंतर आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटनेच्या बळकटीसाठी योगदान द्यावे, असे पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपला मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम; आमदार फुटीच्या चर्चांना उधाण

या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीचा भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात नव्याने पक्षात दाखल झालेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटना मजबूत करण्यासाठी कशा प्रकारे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number