अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने; दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने; दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर
amravati teachers constituency

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली. तर काँग्रेसकडून काल अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबईत लहाने यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. दत्तात्रय लहाने बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून प्राध्यापक पदावर ते कार्यरत राहिले आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमनेसामने लढत होण्याची शक्यता आहे. सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी लहाने हे अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले.

भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात, पण संगीता शिंदे यांचा प्रचार

भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या संगीता शिंदे आणि शिखर भोयर या दोन्ही नेत्यांनी आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करत आपापल्या पातळीवर प्रचाराचा धडाका लावला आहे. संगीता शिंदे यांनी अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये थेट शाळांना भेटी देऊन शिक्षकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत त्या गावोगावी प्रचार करत असून त्यांना शिक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. काँग्रेसचने आपला उमेदवार आधीच जाहीर केला. ज्यामुळे भाजपच्या गोटात उमेदवारीबाबतची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number