Pune Teacher Constituency Election: पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत पेच; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर शिंदे गट अन् राष्ट्रवादी आक्रमक

शिक्षक मतदारसंघावर शिंदे गटाने तर पदवीधर मतदारसंघावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितल्याने तिढा वाढला आहे.

Pune Teacher Constituency Election: पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत पेच; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर शिंदे गट अन् राष्ट्रवादी आक्रमक
पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघावरून महायुती आमने-सामने

Pune Teacher Constituency Election: आगामी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागा भाजपच्या पारंपरिक जागा असल्याचा पुनरुच्चार करत त्यावर पक्षाचा दावा ठोकला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी यासंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. यामुळे या मतदारसंघावरून महायुतीमधील मित्रपक्ष आमने-सामने येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदवीधरवर दावा

शिक्षक मतदारसंघावर शिंदे गटाने तर पदवीधर मतदारसंघावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितल्याने तिढा वाढला आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीची उमेदवारी न मिळाल्यास मंगेश चिवटे यांना ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’च्या माध्यमातून उमेदवारी देऊन ताकदीने निवडून आणू, असा थेट इशारा दिला आहे. खासदार धैर्यशील माने यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगत, उमेदवारी नाकारल्यास पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तयारी दर्शवली आहे.

हेही वाचा – Sharad Pawar Letter to CM: राज्यातील भीषण दुष्काळावर शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून मांडल्या ‘या’ 17 महत्त्वाच्या मागण्या

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयाची शक्यता

दरम्यान, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागांवर दावा केला असला तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “या दोन्ही जागा महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढवल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो भाजपला पूर्णपणे मान्य असेल.” मात्र, स्थानिक पातळीवर सर्वच घटक पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number