‘शिवसेना एकच, दुसरी शिवसेना शाहांचा गट’; दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना एकच असल्याचे म्हणत एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

‘शिवसेना एकच, दुसरी शिवसेना शाहांचा गट’; दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
mp sanjay raut

मुंबई : “शिवसेना एकच आहे, आणि दुसरी संघटना ही अमित शाहांची आहे,” हा थेट आणि तीव्र राजकीय घणाघात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील एका सभेत वक्तव्य केले होते की, आता शिवसेनेत कोणताही गट शिल्लक राहिलेला नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी आणि एकमेव शिवसेना आहे. अमित शाहांच्या या दाव्यानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार पलटवार केला. त्यांनी स्पष्ट केले की, मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि शिंदेंची शिवसेना म्हणजे केवळ “शाहांची संघटना” आहे. आज शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तर गोरेगाव नेस्को येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा संपन्न होणार आहे. याआधीच राऊतांनी शिवसेना नेमकी कुणाची, या मुद्द्यावरून राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

हेही वाचा : शिवसेनेच्या आमदाराचा सरकारलाच घरचा आहेर; ‘चेष्टा चालू आहे का?’, म्हणत सुनावले खडेबोर

काय म्हणाले संजय राऊत

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं ती खरी शिवसेना. ज्या दुसऱ्या शिवसेनेचा उल्लेख केला, ती अजून एका महिन्याभराच्या निकालानंतर कळेल तुम्हाला. ती अमित शाह यांची संघटना आहे. त्यांचा गट आहे. ती अमित शाह यांची दुकानं आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. “परंपरेप्रमाणे उद्धव ठाकरे आजा शिवतीर्थावर मेळावा घेतील. संबोधित करतील.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number