क्रिकेटमध्ये फुटबॉलसारखा नवा नियम; 2027 च्या वनडे विश्वचषकातील सुपर-7 फेरीसाठी ‘असा’ निवडला जाणार सातवा संघ

ही स्पर्धा 2 ऑक्टोबर 2027 रोजी सुरू होणार असून, अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. सर्व 12 संघांची प्रत्येकी 6 संघांच्या दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

क्रिकेटमध्ये फुटबॉलसारखा नवा नियम; 2027 च्या वनडे विश्वचषकातील सुपर-7 फेरीसाठी ‘असा’ निवडला जाणार सातवा संघ
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात फुटबॉलसारखा नवा नियम

ICC ODI World Cup 2027 schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2027 च्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकाचे सर्वसमावेशक वेळापत्रक आणि स्पर्धा स्वरूप जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणाऱ्या या भव्य स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 2 ऑक्टोबर 2027 रोजी सुरू होणार असून, अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. सर्व 12 संघांची प्रत्येकी 6 संघांच्या दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. मात्र, यावेळच्या विश्वचषकात ‘सुपर-7’ फेरीतील सातव्या संघाच्या निवडीसाठी आयसीसीने फुटबॉल विश्वचषकासारखाच अत्यंत रंजक नियम लागू केला आहे.

फुटबॉलच्या धर्तीवर ‘सुपर-7’ मधील सातव्या संघाची निवड

गट फेरीनंतर सुरू होणाऱ्या ‘सुपर-7’ फेरीत दोन्ही गटांतील अव्वल 3-3 संघ (एकूण 6 संघ) थेट पात्र ठरतील. परंतु, सातव्या संघाची जागा निश्चित करण्यासाठी फुटबॉल विश्वचषकासारखी तुलनात्मक पद्धत वापरली जाईल. ज्याप्रमाणे 2026 च्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांची निवड गुण आणि गोल फरकावरून केली गेली होती, त्याच धर्तीवर गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मधील चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या दोन संघांची आपापसात तुलना केली जाईल. ज्या संघाचे गुण आणि ‘नेट रन रेट’ (NRR) अधिक सरस असेल, तो संघ ‘सुपर-7’ फेरीतील सातवी आणि अंतिम जागा पटकावेल.

गट रचना आणि संघांची विभागणी

आयसीसीने घोषित केलेल्या गट रचेनुसार, गट ‘अ’ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि एक पात्रता फेरीतून आलेला संघ (क्वालिफायर) यांचा समावेश आहे. तर गट ‘ब’ मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि एक पात्रता फेरीतील संघ (क्वालिफायर) एकमेकांशी भिडतील. त्यामुळे दोन्ही गटांत साखळी फेरीतच अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – “अनेक वर्षे उराशी बाळगलं ते स्वप्न अपूर्ण राहिलं” टीम इंडियाच्या लेग-स्पिनरची तडकाफडकी निवृत्ती; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने रंगणार ‘सुपर-7’चा थरार

‘सुपर-7’ फेरीतील सामन्यांना 25 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. ही फेरी पूर्णपणे ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने खेळवली जाणार असून, पात्र ठरलेला प्रत्येक संघ इतर सर्व 6 संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाला 6 सामने खेळण्याची संधी मिळेल. ‘सुपर-7’ फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अव्वल 4 स्थानांवर राहणारे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आयसीसीच्या या नव्या नियमामुळे गट फेरीत चौथ्या क्रमांकासाठी होणारी स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number