44 वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण क्षण! भारतीय महिला हॉकी संघाचा दणदणीत विजय; एशियन गेम्समध्ये मिळवलं ऐतिहासिक गोल्ड

Team India Gold Medal : जपानमधील आयची-नागोया येथे सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायमच आहे. स्पर्धेच्या 13 व्या दिवशी भारताच्या महिला हॉकी संघाने दमदार कामगिकी करत थेट सुवर्णपदकारवर नाव कोरले आहे.
Indian Women's Team Creates History
भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जपानमधील आयची-नागोया येथे सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायमच आहे. स्पर्धेच्या 13 व्या दिवशी भारताच्या महिला हॉकी संघाने दमदार कामगिकी करत थेट सुवर्णपदकारवर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चार वेळा आशियाई स्पर्धेचा विजेता ठरलेल्या चीनचा 1-0 असा पराभव केलेला आहे.

आणखी एक मानाचा तुरा
भारतासाठी सामन्याची सुरुवात ही काहीशी उशिराने झाली होती. खरं तर वाहतूक कोंडीमुळे भारतीय संघाला मैदानावर पोहोचण्यासाठी काहीसा उशिर झाल्याने ठरलेल्या वेळेपेक्षा सामना हा उशिरा सुरु करण्यात आला. मात्र, या विलंबाचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही.

हेही वाचा-आशियाई क्रीडा स्पर्धेत सुजित कलकलचा ऐतिहासिक पराक्रम; शेवटच्या 90 सेकंदात बाजी पलटवत जिंकलं सुवर्णपदक

या सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने आक्रमक खेळ दाखवला होता. तर दहाव्या मिनिटाला लालरेम्यियामी ह्मार्झोटेने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चीनने बरोबरी साधण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. अखेर 22 व्या मिनिटाला चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मात्र, भारतीय गोलरक्षक असलेल्या सविताने उत्तम असा बचाव करत संघाला संकटातून बाहेर काढले.

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येसुद्धा चीने दबाव वाढवला. पेनल्टी कॉर्नवरुन गोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय बचावफळीने तो पूर्णपणे हाणून पाडला. चीनला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक हा रेफरलनंतर रद्द करण्यात आला आणि पुन्हा एकदा तो पेनल्टी कॉर्नर देण्यात आला.

हेही वाचा-क्रिकेटमध्ये फुटबॉलसारखा नवा नियम; 2027 च्या वनडे विश्वचषकातील सुपर-7 फेरीसाठी ‘असा’ निवडला जाणार सातवा संघ

सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात चीनने आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. मात्र, भारतीय खेळाडूंनी प्रत्येक हल्ला हा परतवून लावत आपली आघाडी कायम ठेवली. अखेर भारताने 1-0 असा वियज मिळवत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.

44 वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण क्षण
अभिनाची गोष्ट म्हणजे 1982 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. या विजयासोबतच भारताने लॉज एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी पात्रताही मिळवली आहे. आजच्या दिवसातील भारताचे हे सहावे सुवर्णपदक ठरले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version