IPL 2026 च्या 2 तगड्या ओपनर्सचा धुमाकूळ! अभिषेक-वैभवच्या फटकेबाजीने विश्वविक्रम मोडीत

यंगस्टर्सचा धुमाकूळ; भारताच्या नावावर वेगवान शतकाचा विश्वविक्रम!

IPL 2026 च्या 2 तगड्या ओपनर्सचा धुमाकूळ! अभिषेक-वैभवच्या फटकेबाजीने विश्वविक्रम मोडीत

अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेलिंग्टनच्या मैदानातील तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला एकतर्फी पराभूत केले. या दिमाखदार विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.  न्यूझीलंडने दिलेल्या 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 13.2 षटकांत विजय निश्चित केला.

अभिषेक-वैभव जोडीने पहिल्या 7 षटकांतच भारताच्या बाजूने सेट केला सामना

199 धावांचा पाठलाग शेवटच्या षटकापर्यंत रंगेल असे वाटले होते, पण वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा जोडीने पहिल्या षटकापासूनच कंबरडे मोडले. जेकॉब डफीच्या पहिल्या षटकातच 26 धावा कुटल्या गेल्या. या दोघांनी 43 चेंडूत (7.1 षटकांत) पहिल्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 45 धावा कुटल्या.

हेही वाचा – IPL 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्समध्ये मोठे बदल; मायकेल हसी आणि एरिक सिमन्ससह पाच दिग्गजांना निरोप

अभिषेक शर्माचे वादळी शतक – 35 चेंडूत 100

वैभव परतल्यावरही अभिषेकचा धडाका कायम राहिला. त्याने अवघ्या 35 चेंडूत शतक साजरे केले आणि 38 चेंडूत 9 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 113 धावांची दमदार खेळी साकारली. हे त्याचे T20I मधील 4 थे शतक आहे.  संजू सॅमसन 23 चेंडूत 18 धावा करून बाद झाला, त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर जोडीने विजय पक्का केला.

पॉवरप्लेचा विश्वविक्रम!

याआधी हा विक्रम रोमानियाच्या नावावर होता – त्यांनी 2021 मध्ये सर्बियाविरुद्ध 5.4 षटकांत 116/0 धावा केल्या होत्या. भारताने तो मोडला.  तसेच भारताने 100 धावा अवघ्या 5 षटकांत पूर्ण केल्या, जो T20I इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान सांघिक 100 आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number