क्रीडा विश्वाला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या पॅरा-ॲथलीट खेळाडूने संपवली जीवनयात्रा

अवघ्या 42 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण क्रीडा क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. डोपिंग चाचणीतील बंदीमुळे त्यांना या महिन्यात पार पडणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होता आले नव्हते.

क्रीडा विश्वाला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या पॅरा-ॲथलीट खेळाडूने संपवली जीवनयात्रा
Neeraj Yadav Death

भारतीय पॅरा-ॲथलेटिक्स विश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला 3 सुवर्णपदके मिळवून देणारे अनुभवी पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 42 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण क्रीडा क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. डोपिंग चाचणीतील बंदीमुळे त्यांना या महिन्यात पार पडणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होता आले नव्हते. तथापि, त्यांच्या या टोकाचा निर्णय घेण्यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

विष प्राशन केल्याचा संशय

भारतीय पॅरा-ॲथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी नीरज यादव यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नीरज यांनी आपल्या घरी विष प्राशन करून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 28 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रशिक्षक सत्यनारायण यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले की, ही अत्यंत धक्कादायक घटना असून खेळाडूंनी कारकिर्दीतील चढ-उतारांचा आणि संघर्षाचा धैर्याने सामना करायला हवा. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

हेही वाचा – माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून हत्या; शेतातील निवासस्थानासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

आशियाई पॅरा गेम्समध्ये 3 सुवर्णपदकं

नीरज यादव यांची गणना भारतातील अत्यंत यशस्वी आणि प्रतिभाशाली पॅरा-ॲथलीट्समध्ये केली जात होती. F55 श्रेणीमध्ये (बसून खेळल्या जाणाऱ्या मैदानी क्रीडा प्रकारात) त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली होती. 2018 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्यांनी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर, 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर भालाफेक आणि चक्रफेक या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातली होती. अशा या महान खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number