भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि आयपीएल मधील आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधना हिच्या लग्नाबाबत सर्वत्र उत्साह पाहायलाल मिळत होता. 21 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये पलाश मुच्छल याने तिला प्रपोज केले होते. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार होते. त्यांच्या हळदी आणि मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी संपुर्ण टीम इंडिया उत्साहात सहभागी झाली होती.
मात्र स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावल्याने पुढील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. तर दुसरीकडे स्मृतीच्या नवऱ्याशी होणाऱ्या पलाश मुच्छलच्या प्रकृतीतही बिघडल्याची माहिती समोर आली होती. मात्र स्मृतीच्या नवऱ्याचे म्हणजेच पलाश मुच्छलचे काही खाजसी चॅट्स व्हायरल झाले आहेत. त्यात स्मृतीने या सर्व घडामोडींनंतर तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकल्या. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. पलाशच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये पलाश एका मेरी डीकोस्टा या नावाची इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या तरुणीसोबत बोलत होता. असा दावा चॅट्स करत असणाऱ्या व्यक्तीचा आहे. ही चॅट मे 2025 पासूनची आहे, ज्यात पलाशने मेरीला पोहण्यासाठी जाण्यास विचारले होते. पलाशने मेरीच्या सौंदर्याचे कौतुक केले अन् तिला पोहण्यासाठी सकाळी 5 वाजता मुंबईतील वर्सोवा बीचवर भेटण्यासाठी बोलवले.
मेरीने पलाशला स्मृती आवडते का? असा प्रश्न केला त्यावेळी त्याने मेरीला स्पष्ट उत्तर देण्यासाठी टाळल्याचे पाहायला मिळाले. हे चॅट्स रेडिटवर व्हायरल झालेले आहेत, मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही. या चॅट्समुळे स्मृती आणि पलाश या जोडीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या अकाऊंटवर चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले होते, ते अकाऊंट आता डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं आहे.