गेल्या काही दिवसांपासून ईठा चित्रपटाची उत्सुकता सिनेसृष्टीत पालायला मिळत होती. अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटाच्या यशानंतर आता लावणी सम्राज्ञी विठा नारायणगावर यांच्या जीवनावर आधारीत ईठा हा चित्रपट ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर असून सिद्धार्थ जाधव, रणदीप हुडा यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर दिवंगत नाना पाटेकर यांचीही व्यक्तिरेख प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूरचा आणखी एक जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे, ज्याच्या शेवटच्या 30 सेकंदात श्रद्धा कपूरने महाराष्ट्राची कित्येक मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी श्रद्धाचं भरभरून कौतुक केलं आहे.