पुणेकरांना मोठा दिलासा! म्हाडाच्या अर्जाची मुदत वाढली, जाणून घ्या अंतिम तारीख

म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे.

पुणेकरांना मोठा दिलासा! म्हाडाच्या अर्जाची मुदत वाढली, जाणून घ्या अंतिम तारीख

म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे. अशातच, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या इच्छुकांना अद्याप अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

म्हाडाच्या 15% सामाजिक आणि 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोबर होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली असून इच्छुकांना 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.


मुदतवाढीचे कारण काय?

तांत्रिक अद्ययावतीकरण आणि डेटा सेंटरच्या स्थलांतरामुळे 16 ते 21 ऑक्टोबर 2026 दरम्यान म्हाडाची प्रणाली पूर्णपणे बंद होती. या तांत्रिक अडचणींमुळे अधिवास (Domicile) आणि उत्पन्न प्रमाणपत्रांची ऑनलाइन पडताळणी ठप्प झाली होती. परिणामी, 10,000 हून अधिक अर्जदारांचे प्रोफाइल अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. या तांत्रिक अडचणींमुळेच अर्जाची मुदत वाढवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number