पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची ऐतिहासिक बाजी! दणदणीत विजयानंतर कौस्तुभ गावडे ठरले राज्यातील सर्वात तरुण आमदार

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची ऐतिहासिक बाजी! दणदणीत विजयानंतर कौस्तुभ गावडे ठरले राज्यातील सर्वात तरुण आमदार
Kaustubh Gawade victory

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली आहे. महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढतीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा मोठ्या मताधिक्याने धुव्वा उडवला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच कौस्तुभ गावडे यांनी आपली आघाडी भक्कम ठेवत पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखले होते. त्यांचा अधिकृत विजय निश्चित होताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला.

मतांची मोठी तफावत अन् प्रतिस्पर्ध्यांचा दारुण पराभव

निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांनी तब्बल 18,385 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्याविरोधात लढणारे शिंदेसेनेचे सचिन सानप 11,983 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कौस्तुभ गावडे यांनी प्रमुख दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकल्याने या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

कोल्हापुरात जल्लोष आणि सर्वात तरुण आमदाराचा बहुमान

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचे वृत्त समजताच कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. या विजयानंतर बोलताना कौस्तुभ गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना हा बहुमान मिळत असून, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते यापुढेही शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – ‘शिक्षकांनी माझी किंमत…’; अमरावतीत पराभवानंतर भाजप बंडखोर उमेदवार संगीता शिंदेंच्या स्टेट्सची सर्वत्र चर्चा

पराभवानंतर सचिन सानप यांची पहिली प्रतिक्रिया

निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पराभूत उमेदवार सचिन सानप यांनी कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन करत माध्यमांशी संवाद साधला. ही मुख्य लढत माझ्या आणि भाजप उमेदवारादरम्यानच झाली असून मतांच्या विभागणीचा मुद्दा येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, निवडणुकीत पैसे वाटल्याच्या चर्चांवर बोलताना शिक्षकांना बदनाम करू नये असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी यावेळी शिक्षक प्रतिनिधी निवडला नाही ही खंत मनात असली तरी आगामी काळातही शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number