अमरावतीत शिवसेनेच्या नेत्याकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच फडकलं बंडाचं निशाण

महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, शिंदे सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

अमरावतीत शिवसेनेच्या नेत्याकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच फडकलं बंडाचं निशाण
shrikant deshpande 2

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीममध्ये बंडाचं निशान फडकताना दिसत आहे. महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, शिंदे सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना देशपांडे म्हणाले, “मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी’ या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवेन, असही श्रीकांत देशपांडे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात महिला कनेक्शन उघड; मुख्य आरोपीच्या संपर्कातील 3 महिला पोलिसांच्या ताब्यात

विरोधकांवर आणि सध्या सुरू असलेल्या मोफत साड्या वाटपावर निशाणा साधताना देशपांडे म्हणाले की, “साड्या-चोड्या वाटणारे वाटतील आणि घेणारे घेतील. पण शिक्षक मतदार अत्यंत सुज्ञ आहे, तो यावेळी ताकही फुंकून पिणार आहे.” श्रीकांत देशपांडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. याबाबत श्रीकांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, “उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरी ‘शिक्षक आघाडी’च्या बॅनरखाली निवडणूक लढवणार,” अशी भूमिका देशपांडे यांनी मांडली. त्यामुळे महायुतीतील अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच शिंदेसेनेतील अंतर्गत स्पर्धा उघडपणे समोर आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number