Thursday, May 16, 2024 02:13:25 AM

व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण

व्यंकय्या नायडू बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बिंदेश्वर पाठक यांना सामाजिक कार्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एम. व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक क्षेत्रातील कार्यासाठी तर पद्मा सुब्रह्मण्यम यांना भरतनाट्यम आणि नाट्यशास्त्र या दोन विषयांतील संशोधनासाठी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नेते राम नाईक यांना सार्वजनिक क्षेत्रातील कार्यासाठी तर दिग्दर्शक राजदत्त यांना चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी तर उषा उत्थुप यांना गायन क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. टेनिसपटू रोहन बोपण्णा याला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बिंदेश्वर पाठकांना मरणोत्तर पद्मविभूषण
व्यंकय्या नायडू आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण
ज्येष्ठ नेते राम नाईक, दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण
अभिनेते मिथुन चक्रवर्ती, गायिका उषा उत्थुप यांना पद्मभूषण
टेनिसपटू रोहन बोपण्णा पद्मश्रीने सन्मानित

  

सम्बन्धित सामग्री






Live TV