महाराष्ट्र: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय योजना ठरली. या योजनेमध्ये महिलांना प्रतिमहिना 1500 दिले जातात. परंतु या योजनेमध्ये काही महिलांनी पात्र नसून सुद्धा लाभ घेतल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेतला. यामुळे आता अपात्र लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी केली जातेय. यामुळे आता अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केलीय.
हेही वाचा : SIP तर माहीत आहे,आता जाणून घ्या STPचं गुपित!
काय म्हणाले अजित पवार?
लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या आठ दिवसांत खात्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 25 फेब्रुवारीच्या आधी खात्यात 1500 रूपयांचा हप्ता जमा होण्यास सुरूवात होईल. पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, त्याआधी सरकार राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यत फेब्रुवारीचे 1500 रूपये जमा करेल, असी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार?
1.ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा बाद केला जाईल.
2.अर्ज बाद केल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
3.ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही.