वाशिम हादरलं! बापानेच आवळला लेकीचा गळा, अंत्यसंस्कारही उरकले; पण एका माहितीने फुटलं बिंग

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणवाडा गावात वडिलांनीच आपल्या 35 वर्षीय विवाहित मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News
Crime News

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणवाडा गावात वडिलांनीच आपल्या 35 वर्षीय विवाहित मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी विवाहित असूनही तिचे दुसऱ्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. वारंवार समजूत काढुनही मुलगी ऐकत नसल्यानं रागाच्या भरात वडिलांनी तिची 20 ऑक्टोबरच्या रात्री हत्या केली.

हेही वाचा- आधी धारदार शस्त्राने वार, नंतर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; उरणमध्ये गुन्हेगारीचा थरार

एतकचं नव्हे तर दुसऱ्या दिवशी तिच्या मृतदेहाचे रीतसर अंत्यसंकार उरकले आणि काटेपूर्णा नदीत तिचे अस्थी विसर्जनही केले. पण पोलिसांना याची गुप्त माहिती मिळाली आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली. आता मुलीची आई तक्रार देण्यासाठी पुढे आली असून तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version