गडचिरोलीत खळबळ! आई-वडिलांनी घरी नेलं नाही; 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.

गडचिरोलीत खळबळ! आई-वडिलांनी घरी नेलं नाही; 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. केवळ 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी कुरखेडा तालुक्यातील सोनसरी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होती. आई-वडिलांनी तिला घरी नेले नाही, या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नेमके काय घडले?
शाळेतील पालक सभेसाठी आलेल्या आई-वडिलांकडे या विद्यार्थिनीने आरमोरी शहरातील दुर्गोत्सव पाहण्यासाठी घरी जाण्याचा हट्ट धरला होता. मात्र काही कारणास्तव पालकांनी तिला नकार दिला. या रागातून तिने आश्रमशाळेतच गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – आधी आजारपणाचं कारण, मग ग्लुकोज पावडरच्या बहाण्याने घरी नेलं; तरुणीसोबत नराधमांनी क्रुरतेचा कळसच गाठला

या घटनेमुळे सोनसरी आश्रमशाळा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number