मध्य प्रदेशात सत्संगासाठी जाताना भीषण अपघात, चाकाचा एक्सल तुटल्याने वाहन 2 वेळा पलटी; 19 जण गंभीर जखमी

मध्य प्रदेशात सत्संगासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला जळगावजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशात सत्संगासाठी जाताना भीषण अपघात, चाकाचा एक्सल तुटल्याने वाहन 2 वेळा पलटी; 19 जण गंभीर जखमी

जुगल पाटील – जळगाव प्रतिनिधी

मध्य प्रदेशात सत्संगासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला जळगावजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी जात असलेल्या भुसावळ तालुक्यातील विविध गावांमधील आदिवासी बांधवांच्या 407 मालवाहू वाहनाचा कानळदा रोडवर अपघात झाला. बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटल्याने वाहन 2 वेळा पलटी झाले. या अपघातात 19 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – अक्षता पडण्याआधीच लग्नमंडपात थरार! प्रेमविवाहावरून पेट्रोल टाकून….;महाराष्ट्र हादरला

नेमके काय घडले?

भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव सत्संगासाठी मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, कानळदा रोडवर वाहनाचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. जळगावच्या बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ हा अपघात झाला. मागील चाकाचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व 19 जखमींवर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version