मंचर-भीमाशंकर मार्गावर भीषण अपघात; इको कार दरीत कोसळून 2 जणांचा अंत, 4 जण गंभीर जखमी

मंचर-भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. इको कार दरीत कोसळून झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मंचर-भीमाशंकर मार्गावर भीषण अपघात; इको कार दरीत कोसळून 2 जणांचा अंत, 4 जण गंभीर जखमी

मंचर-भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. इको कार दरीत कोसळून झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दुर्घटनेमुळे चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा – धक्कादायक! लसीकरणासाठी माहेरी जाण्यावरून वाद; सासऱ्याने काठीने मारहाण करत 8 महिन्यांच्या गर्भवती सुनेला संपवलं

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मात्र, यापूर्वीही महामार्गांसह अनेक ठिकाणी अपघातांची नोंद झाली होती. या अपघातांना आळा घालून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना आखल्या आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

याअंतर्गत 48 ब्लॅक स्पॉट्स शोधण्यात आले असून, या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रस्त्यांचा पृष्ठभाग सपाट करणे आणि पादचारी मार्ग सुधारणे यांवरही भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number