मसाले, तेलानंतर आता चॉकलेट्स-ड्रायफ्रूट्सवर FDA ची धडक; पनवेलच्या ‘या’ प्रसिद्ध शॉपमधून 4.21 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळीआधीच रोजच्या वापरातील मसाले, तेलानंतर चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्सवर FDA ची धडक कारवाई; 4.21 कोटींचा अन्नसाठा जप्त, पनवेलमधील प्रसिद्ध

मसाले, तेलानंतर आता चॉकलेट्स-ड्रायफ्रूट्सवर FDA ची धडक; पनवेलच्या ‘या’ प्रसिद्ध शॉपमधून 4.21 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पनवेलमध्ये मोठी कारवाई केली आहे. शनिवार, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपीच्या गोदामातून 4 कोटी 21 लाख 6 हजार 961 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

तपासणीत काय आढळले?

संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने आणि त्यांच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आयात केलेले चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये दोष आढळल्याने तसेच काही अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असण्याची शक्यता असल्याने हा साठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; तब्बल 1.29 लाखांची 431 किलो खोबरे पावडर जप्त

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे.

याआधी तुळजाभवानी प्रसाद, हळद-मसाले तसेच रोजच्या वापरातील खाद्यतेलावर FDA ने धडक कारवाई केली होती. त्यानंतर आता दिवाळीआधीच कोट्यवधी रुपयांचे चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number