जवळच्या मित्रावर आंधळा विश्वास आणि पत्नीवर प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत असं काही घडेल, याची त्याने जराही कल्पनाही केली नव्हती. पहिल्या पतीला सोडून तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले होते. मात्र, याच प्रेमविवाहाचा शेवट इतका भयंकर ठरला की, समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मशीन ऑपरेटर म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीची त्याच्याच बायकोने हत्या केली आहे. मृताचं नाव गोपाल असं असून त्याची पत्नी काजलने चक्क प्रियकराच्या मदतीने त्याला संपवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोळा वर्षांपूर्वी काजलने आपल्या पहिल्या पतीला सोडून देत गोपालसोबत लव्ह मॅरेज केले होते. गोपाल आणि काजलला चार मुले असून गोपाल हा फरीदाबादमध्ये नोकरीसाठी होता आणि अधूनमधून गावी जायत असत, तर काजल ही मुलांसह हाथरस येथील गावी राहत होती.
हेही वाचा – मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ
समोर आलं जवळचं नात
काजल आणि गोपाल याचे लग्न झाल्यानंतर संसार हा अगदी सुरळीत सुरु होता. मात्र, याच संसारात गोपाळचा मित्र आणि व्यवसायाने बाउंसर असलेला योगेंद्र याची एन्ट्री झाली. हळहळू योगेंद्रमुळे गोपाल आणि काजल यांच्यात दुरावा निर्माण झाला. गोपाल घरी नसताना योगेंद्र वारंवार त्यांच्या घरी येऊ लागल्याने पती-पत्नीमध्ये भांडण होऊ लागली. सततचे होत असलेल्या वादाला कंटाळून गोपाल अनेक महिने आपल्या गावी गेला नाही. याच कौटुंबिक वादातून काजलने योगेंद्रच्या मदतीने गोपालला कायमचा संपवण्याचा कट रचला, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
असा रचला कट?
काजल आपल्या मुलांसह 13 ऑक्टोबर रोजी फरीदाबादला गेली आणि दुसऱ्या दिवशी तिन योगेंद्रलाही त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर 14, 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोपाल दारुच्या नशेत गावी परतला. तो गाढ झोपेत असतानाच काजलने भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्या गळ्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर घरात चोर घुसल्याची खोटी गोष्ट रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
गोपालच्या भावात संशय मुलीवर
फरीदाबाद पोलिसांनी या घटनेचा तपास तातडीने सुरु केला. चौकशीदरम्यान काजल आणि तिचा प्रियकर योगेंद्र या दोघांचाच या हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, गोपालच्या भावाने त्याच्या मुलीवरही संशय व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तिचा कोणताही सहभाग आढळला नाही. सध्या पोलिस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.