Saturday, July 20, 2024 11:52:46 AM

Tamilnadu
विषारी दारूमुळे तामिळनाडूत ५८ मृत्यू

विषारी दारू प्यायल्यामुळे तामिळनाडूत ५८ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयात अद्याप १०० पेक्षा जास्त नागरिक आहेत.

विषारी दारूमुळे तामिळनाडूत ५८ मृत्यू

कल्लाकुरिची : विषारी दारू प्यायल्यामुळे तामिळनाडूत ५८ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयात अद्याप १०० पेक्षा जास्त नागरिक आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. तामिळनाडू भाजपाने या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्य सरकारने विषारी दारू प्रकरणात मृतांच्या जवळच्या नातलगांना दहा - दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. रुग्णालयात असलेल्यांना उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सीबी - सीआयडीने विषारी दारू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


सम्बन्धित सामग्री