दोन वर्षांच्या भेटीगाठीत फुललं प्रेम! 30 वर्षीय इन्स्टाग्राम ब्लॉगर थाटणार 75 वर्षांच्या ज्येष्ठाशी लग्न

सहार ब्लॉक मधील अरियारी गावचे रहिवासी असलेले 75 वर्षीय रामसुगर आणि दयालपूर येथील 30 वर्षीय इन्स्टाग्राम ब्लॉगर राणी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
दोन वर्षांच्या भेटीगाठीत फुललं प्रेम! 30 वर्षीय इन्स्टाग्राम ब्लॉगर थाटणार 75 वर्षांच्या ज्येष्ठाशी लग्न
Ramsugar and Rani marriage

‘प्रेमाला वयाचे कोणतेही बंधन नसते’ या म्हणीचा जिवंत प्रत्यय देणारी एक अनोखी आणि विलक्षण प्रेमकथा उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून समोर आली आहे. सहार ब्लॉक मधील अरियारी गावचे रहिवासी असलेले 75 वर्षीय रामसुगर आणि दयालपूर येथील 30 वर्षीय इन्स्टाग्राम ब्लॉगर राणी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या वयात तब्बल 45 वर्षांचे अंतर असले, तरी त्यांनी पूर्ण पारंपरिक रितीरिवाजांनुसार एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या विवाहामुळे संपूर्ण गावात आणि सोशल मीडियावर सध्या याच प्रेमकथेची जोरदार चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांच्या भेटीगाठींतून फुलले प्रेम

रामसुगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या घरी नियमित येत होती. या कालावधीत त्यांच्यात संवाद वाढला आणि हळहळू या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही परस्पर सहमतीने लग्न करण्याचा निर्णय पक्का केला. आठवड्याभरापूर्वीच या दोघांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. रामसुगर यांची मुलगी राधा ही स्वतः एक युट्युबर आहे. राधाने सांगितले की, 7 वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते. राणी त्यांच्या घरी येत असताना सर्वांसोबत मिळून व्हिडिओ बनवायची. याच दरम्यान तिचे आणि रामसुगर यांचे सूत जुळले.

हेही वाचा – ‘कोणीही न्यायालयाला धमकावू शकत नाही…’; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा; मुख्य निवडणूक आयुक्तांनाही नोटीस

साखरपुड्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल

राधाने आपल्या वडिलांच्या आणि राणीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर स्थानिक नागरिकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये या लग्नाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष या दोघांच्या विवाहाच्या तारखेकडे आणि आगामी सोहळ्याकडे लागले आहे. वयातील अफाट तफावत असूनही कुटुंबाच्या संमतीने होणारा हा विवाह परिसरात कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय ठरला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version