Tuesday, November 18, 2025 03:35:38 AM

Cough Syrup Row: 'हे कफ सिरप नाहीत, विष आहे...'; WHO कडून तीन भारतीय औषध कंपन्यांना कडक इशारा

मध्य प्रदेशातील कोल्ड्रिफ सिरप प्रकरणात 20 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठी कारवाई करत तीन भारतीय औषध कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.

cough syrup row हे कफ सिरप नाहीत विष आहे who कडून तीन भारतीय औषध कंपन्यांना कडक इशारा

Cough Syrup Row: गेल्या काही दिवसांपासून देशभरात विषारी कफ सिरप प्यायल्याने अनेक चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील कोल्ड्रिफ सिरप प्रकरणात 20 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठी कारवाई करत तीन भारतीय औषध कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. WHO ने स्पष्टपणे म्हटले आहे की, 'हे कफ सिरप नाही, तर विष आहे.' 

तीन कंपन्यांना WHO चा इशारा

रॉयटर्सच्या अहवालानुसार, WHO ने तीन कंपन्यांचे विशिष्ट बॅच ओळखले आहेत, जे भेसळयुक्त आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत:

श्रीसन फार्मा – कोल्ड्रिफ सिरप

रेडनेक्स फार्मा – रेस्पिफ्रेश TR सिरप

शेप फार्मा – रिलाइफ सिरप

WHO ने सर्व देशांना आणि औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की, हे सिरप कुठेही आढळल्यास त्वरित तक्रार करून त्यांची विक्री थांबवावी. 

हेही वाचा - Jammu Kashmir Attack On Terrorist : कुपवाडा नियंत्रण रेषेवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराची कारवाई

विषारी रसायन डायथिलीन ग्लायकॉलचा वापर

तपासणीदरम्यान, या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) नावाचे विषारी रसायन आढळले. हे रसायन गोडपणा आणण्यासाठी वापरले जाते, परंतु ते मानवी शरीरासाठी प्राणघातक ठरू शकते. याला रंग किंवा वास नसल्यामुळे, चाचणीशिवाय ओळखणे अवघड असते. तज्ञांच्या मते, DEG शरीरात गेल्यानंतर मूत्रपिंड निकामी होणे, मस्तिष्कावर परिणाम होणे आणि मृत्यू देखील संभवतो.

हेही वाचा - Cough Syrup Row: ED ची मोठी कारवाई! चेन्नईतील कोल्ड्रिफ उत्पादक श्रीसन फार्मा आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी

श्रीसन फार्माचा परवाना रद्द, मालकाला अटक

घटनेनंतर तामिळनाडू सरकारने श्रीसन फार्माचा परवाना रद्द केला आहे आणि कंपनी बंद करण्याचा आदेश दिला आहे. राज्य औषध नियंत्रण विभागाने तपासणीदरम्यान सिरपमध्ये 48.6 टक्के DEG असल्याचे आढळले. कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, WHO ने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे भेसळयुक्त औषध तयार करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच पालकांना विनंती करण्यात आली आहे की, अज्ञात ब्रँडचे औषध मुलांना देऊ नये आणि शंका असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


सम्बन्धित सामग्री