Tuesday, November 11, 2025 09:48:18 AM

Employee Quits Government Job : 'घुसमट होतेय!' सुरक्षित भासणाऱ्या सरकारी नोकरीची अशी स्थिती; 39 व्या वर्षी बँक कर्मचाऱ्याचा राजीनामा

सरकारी नोकरीमुळे स्थिरता, चांगलं घर, गाडी आणि समाजात आदर मिळतो, असे आपल्याला वाटत होते, पण आता वास्तव बदलले आहे, असा अनुभव या तरुणाने शेअर केला आहे.

employee quits government job  घुसमट होतेय सुरक्षित भासणाऱ्या सरकारी नोकरीची अशी स्थिती 39 व्या वर्षी बँक कर्मचाऱ्याचा राजीनामा

Bank Employee Quits Government Job : सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य आणि निवृत्तीपर्यंतची हमी, अशी धारणा आजही भारतीय समाजात आहे. परंतु, आता काळ बदलला असून, अनेक तरुण सरकारी नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेत आहेत. अशाच एका प्रकारात एका 39 वर्षीय तरुणाने सरकारी बँकेतील नोकरीचा राजीनामा देण्याचा धक्कादायक अनुभव Reddit वर शेअर केला आहे, ज्यामुळे सरकारी नोकरीतील वाढत्या तणावावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोग्याच्या समस्यांमुळे दिला राजीनामा
'r/IndianWorkplace' या Reddit फोरमवर तरुणाने आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, "मी 39 वर्षांचा आहे. सरकारी बँकेच्या नोकरीत माझी घुसमट होत होती. मला नाही वाटत मी आणखी काही काळ हे काम करू शकेन." देशातील तीन अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून ही नोकरी मिळवल्यानंतरही त्याला राजीनामा देण्याची वेळ का आली, याचे सविस्तर विश्लेषण त्याने केले आहे.

सुरक्षित नोकरीचे बदलते वास्तव
सरकारी नोकरीमुळे स्थिरता, चांगलं घर, गाडी आणि समाजात आदर मिळतो, असे आपल्याला वाटत होते, पण आता वास्तव बदलले आहे, असे तो म्हणाला. सरकारी नोकरीमुळे त्याला सध्या उच्च रक्तदाब, थायरॉईड समस्या आणि फॅटी लिव्हर अशा आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामागे त्याने खालील कारणे दिली:

हेही वाचा - Software Engineer Post : 4 महिने बेरोजगार, मग 9 दिवसांत नवी नोकरी सोडली! सॉफ्टवेअर इंजिनिअरने शेअर केली पोस्ट

अवास्तव कामाचे तास: रोज 12 तास काम करावे लागते
सेल्स टार्गेटचा दबाव: विमा उत्पादने विकण्यासाठी भाग पाडले जाते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटीही काम करावे लागते.
सततच्या बदल्या: सततच्या बदल्यांमुळे कुटुंबासोबत दुर्गम भागात स्थलांतर करावे लागत आहे.
बॉसेसचा दबाव: वरिष्ठांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करताना दमछाक होते.

'माझा आनंद महत्त्वाचा!'
सध्या आपल्या सहकाऱ्यांचीही अशीच अवस्था असून ते निराशेच्या वाटेवर असल्याचे या तरुणाने सांगितले. त्याने नोकरी सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहत म्हटले की, "मी आता कामावर जाणं थांबवलं आहे. माझं वेतन खंडित होईल आणि माझा आर्थिक संघर्ष सुरू होईल, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही माझ्या जीवनातला आनंद मी मिळवू शकेन, असा मला विश्वास आहे."

त्याच्या या पोस्टला Reddit वर मोठा पाठिंबा मिळत आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, "मी आयटीमध्ये असून मलाही उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरची समस्या आहे. मला वाटायचं की सरकारी नोकरी बरी, पण तुमची पोस्ट वाचल्यावर 'पल्याडल्या बाजूचं गवत अधिक हिरवं दिसतं' या म्हणीची प्रचिती आली."

हेही वाचा - Divorce Couple Survey: घटस्फोटामुळे कर्जबाजारी झाले 42 टक्के पुरुष! सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक आकडेवारी


सम्बन्धित सामग्री