गरबा खेळताना पाय सुजतायत? बर्फाचा शेक देऊन मिळवा आराम; पण ‘ही’ चूक टाळा

Health Tips : नवरात्रीत तासनतास गरबा खेळल्याने पायांना सूज येते. यावर बर्फाचा उपाय गुणकारी आहे. मात्र, कसा नेमका वापर करावा जाणून घ्या.

गरबा खेळताना पाय सुजतायत? बर्फाचा शेक देऊन मिळवा आराम; पण ‘ही’ चूक टाळा
Garba Foot Swelling Tips

नवरात्री उत्सवात गरबा आणि दांडिया खेळण्याचा उत्सहा हा शिगेला पोहोचलेला आहे. मात्र, तासनतास गरबा खेळल्यानंतर अनेकांच्या पायांना सूज येणे किंवा वेदना होण्याची समस्या जाणवते. सतात उभे राहणे, उड्या मारणे आणि चुकीच्या चपलामुळे पायांच्या स्नायूंवर ताण येतो आणि सूज येते.

‘हा’ उपाय करा
यावर अगदी सोपा आणि अत्यंत झटपट उपाय म्हणजे बर्फाचा शेक घेणे. डॉक्टरांच्या मते, गरबा खेळून आल्यानंतर तातजीने साधारण 2 मिनिटे तरी बर्फाने शेक दिल्यास पायाची सूज लगेच उतरते.

हेही वाचा-एकच चणिया चोली आहे? थांबा! 3 वेगळ्या स्टाइलमध्ये कशी घालाल ते जाणून घ्या, नवरात्री स्पेशल आउटफिट हॅक

कसा करावा उपाय?
एका वाटीत साधारण बर्फाचे 4 ते 5 बर्फाचे तुकडे घ्या आणि एका सुती कापडात गुंडाळून घ्या. आता याच कापडाने सुजलेल्या भागावर अतिशय हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. लक्षात ठेवा की, बर्फ हा थेट त्वचेवर लावू नका, एका कापडात गुंडाळूनच तो लावावा. फक्त 2 मिनिटेच हा उपाय केल्याने रक्ताभिसरण सुधारणे आणि सूज कमी होते.

‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा
गरबा खेळण्यापूर्वी पायांचे योग्य स्ट्रेचिंग करुन घ्या. गरबा खेळण्यासाठी नेहमीच प्लॅट आणि आरामदायक चप्पल वापरा. गरबा खेळताना प्रत्येकाने मध्ये मध्ये पाणी पिणे आवश्यक आहे. घरी आल्यानंतर 10 मिनिटे पाय उंचावर ठेवून झोपा. यामुळे पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या दूर होईल आणि तु्म्ही नऊ दिवस बिनधास्त गरबा खेळू शकाल

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number