महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 17 Oct 2026 02:05 PM (IST)

    पुण्याच्या भोर तालुक्यातील ज्वेलर्सवर, बुरखा घालून आलेल्या चौघांकडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न

    हातात कोयते-बंदुका घेऊन दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा दरोडे खोरांकडून प्रयत्न करण्यात आला..मात्र शेजारच्या दुकानदाराने आरडाओरडा केल्याने.. दरोड्याचा प्रयत्न फसला.मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 8 च्या सुमारास चार दरोडेखोर बुरख्यात कोयता, बंदूक लपवून दुकानात घुसले.. आणि त्यांच्याकडून दुकान दाराला शस्त्रचा धाक दाखवित लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला..

  • 17 Oct 2026 01:57 PM (IST)

    आदिवासींच्या मागण्यांवर आज जळगावात महत्त्वाची बैठक; चार मंत्र्यांची उपस्थिती

    जळगावमध्ये आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आदिवासी विकासमंत्री यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

  • 17 Oct 2026 01:41 PM (IST)

    बहिणीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मित्रानेच केला खुनाचा कट; नारपोली पोलिसांची 4 तासांत कारवाई

    भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील महावीर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस निर्जनस्थळी सूरज रणजीत शर्मा (27) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. बहिणीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या रागातून मित्रांनीच त्याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या चार तासांत संदेश खंडारे (20) आणि आकाश पवार (19) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • 17 Oct 2026 01:39 PM (IST)

    दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली; प्रशासनाच्या अटींची पूर्तता करणार- महेश सावंत

    शिवसेना UBT आमदार महेश सावंत यांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती दिली. तसेच, प्रशासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

  • 17 Oct 2026 01:31 PM (IST)

    सातारा-देवळाईकरांना दिवाळीपूर्वीच दिलासा? नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन

    छत्रपती संभाजीनगरच्या सातारा-देवळाई परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नव्या जलवाहिनीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. दिवाळीपूर्वीच काम पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, नव्या जलवाहिनीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

  • 17 Oct 2026 01:30 PM (IST)

    मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट? अब्दुल सत्तारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार

    मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला असताना, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून, निवडणुकीच्या प्रचारात महायुतीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • 17 Oct 2026 01:06 PM (IST)

    वसुंधरा पायी दिंडीअंतर्गत सावर्डेत वृक्षारोपण; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लागवड

    जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सावर्डे येथील कोंडमाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

  • 17 Oct 2026 01:05 PM (IST)

    अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर BMC चा हातोडा

    मुंबई महापालिकेकडून अभिनेता अजय देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

  • 17 Oct 2026 12:57 PM (IST)

    नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

    शारदीय नवरात्रोत्सवामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्ट्यांचे दिवस असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • 17 Oct 2026 12:52 PM (IST)

    अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरीवरून महायुतीत वाद

    अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीवरून भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. श्रीकांत देशपांडे यांच्यावर कारवाई करून बंडखोरी रोखावी, असा सल्ला त्यांनी दिला.

17 Oct 2026 12:44 PM (IST)
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number