नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरिकांचे स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ज्या निर्णयात अंतर्गत बससेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.
NMMTच्या ताफ्यात मोठी भर पडणार
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे. ज्या जुन्या डिझेल बसेसचे आयुर्मान हे संपत आल्याने पर्यावरणपूरक बसेस या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहे. ग्रॉस कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलनुसार तब्बल 160 नव्या बसेस घेतल्या जाणार आहेत. ज्यामध्ये 150 सीएनजी बसेस तर 10 वातानुकूलित इलेक्ट्रिक डबर डेकर बसेसचा समावेश करण्यात येईल.
खरं तर 2026-27 या आर्थिक वर्षात एनएमएमटीच्या 206 जुन्या बसेस या टप्प्याटप्प्याने बाद केल्या जातील. भांडवल तसेच मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या 100 बसेस स्व-खर्चाने खरेदी केल्या जातील, तर 150 सीएनजी बसेस कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणार आहेत.
शिवाय केंद्राच्या पीएम ई-बस सेवा योजनेस उशीर झाल्याने 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस लवकरात लवकर भाडेतत्त्वार घेतल्या जाणार आहेत. या .या करारानुसार बस खरेदी, देखभाल, चालक, विमा आणि आरटीओ कराची जबाबदारी कंत्राटदाराची असेल, तर वाहक, नियंत्रण आणि इंधन पुरवठा NMMT करेल. जाहिरात हक्कही NMMT कडेच राहतील.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.