माथेरानच्या प्रवाशांसह सर्व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा शुक्रवारपासून म्हणजेच 30 ऑक्टोबर 2026 पासून पुन्हा एकदा पूर्ववत होत आहे. रेल्वेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
पावसाळा संपल्याच्या पाश्वर्भूमीवर आता पर्यटकांना पुन्हा एकदा निसर्गरम्य घाटातून मिनी ट्रेनने प्रवास करता येणार असून, मध्य रेल्वेने या सेवेचे सुधारित वेळापत्रक आणि डब्यांची रचना जाहीर केली आहे. यामध्ये रिस्टोअर केलेल्या डब्यांसह विस्टाडोम डब्यांचा समावेश असून अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा आधीप्रमाणेच सुरू राहणार आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर दरम्यान नेरळ-माथेरान रेल्वे सेवा बंद असते.
संपूर्ण वेळापत्रक आणि डबे:
– 52103 (नेरळ ते माथेरान): नेरळहून सकाळी 08:50 वाजता, माथेरानला 11:30 वाजता. डबे – 3 द्वितीय श्रेणी + 2 विस्टाडोम + 1 लगेज व्हॅन (6 डबे)
– 52105 (नेरळ ते माथेरान): नेरळहून सकाळी 10:25 वाजता, माथेरानला 13:05 वाजता. डबे – 3 द्वितीय श्रेणी + 2 प्रथम श्रेणी + 1 लगेज व्हॅन (6 डबे)
– 52104 (माथेरान ते नेरळ): माथेरानहून दुपारी 14:45 वाजता, नेरळला 17:30 वाजता.
– 52106 (माथेरान ते नेरळ): माथेरानहून दुपारी 16:00 वाजता, नेरळला 18:40 वाजता.
2. अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दररोज)
1. गाडी क्रमांक 52153: अमन लॉज येथून 08:45 वाजता सुटेल, माथेरान येथे 09:03 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 52155: अमन लॉज येथून 09:34 वाजता सुटेल, माथेरान येथे 09:53 वाजता पोहोचेल.
3. गाडी क्रमांक 52157: अमन लॉज येथून 12:00 वाजता सुटेल, माथेरान येथे 12:18 वाजता पोहोचेल.
4. गाडी क्रमांक 52159: अमन लॉज येथून 14:25 वाजता सुटेल, माथेरान येथे 14:43 वाजता पोहोचेल.
5. गाडी क्रमांक 52161: अमन लॉज येथून 15:40 वाजता सुटेल, माथेरान येथे 15:58 वाजता पोहोचेल.
6. गाडी क्रमांक 52163: अमन लॉज येथून 17:45 वाजता सुटेल, माथेरान येथे 18:03 वाजता पोहोचेल.
3. शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील
विशेष-2: माथेरान येथून 10:05 वाजता सुटेल, अमन लॉज येथे 10:23 वाजता पोहोचेल.
विशेष-4: माथेरान येथून 13:40 वाजता सुटेल, अमन लॉज येथे 13:58 वाजता पोहोचेल.
पर्यटन हंगाम सुरू होताच ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. हवामानातील बदलांमुळे पावसाची शक्यता असली, तरी पावसाळी हंगाम संपल्याने पर्यटकांना नेरळ-माथेरान मिनी ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.