वैभव सूर्यवंशी OUT, स्टार खेळाडू IN? IND vs NZ चौथ्या T20 साठी टीम इंडियात 4 मोठे बदल?

भारतीय क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून T-20 मालिकेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या T-20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

वैभव सूर्यवंशी OUT, स्टार खेळाडू IN? IND vs NZ चौथ्या T20 साठी टीम इंडियात 4 मोठे बदल?

भारतीय क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून T-20 मालिकेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या T-20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.तिसऱ्या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्मा याने 113 धावांची वादळी शतकी खेळी केली. तर आयपीएलमधून प्रकाशझोतात आलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत सर्वांना अवाक केले. त्याचे अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकले असले तरी, दोघांनी मिळून 133 धावांची दमदार सलामी देत विजयाचा भक्कम पाया रचला. मालिकेत विजयी आघाडी घेतली असली तरी चौथ्या T-20 सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये 4 मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

चौथ्या सामन्यातील 4 संभाव्य मोठे बदल:

1. वैभव सूर्यवंशी बाहेर, ईशान किशनचे कमबॅक?
वैभवला गेल्या दोन सामन्यात संधी मिळाली होती. मात्र चौथ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. ईशान किशन दुखापतीतून सावरला तर अंतिम 11 मध्ये त्याला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

2. नितीश कुमार रेड्डीला आराम
अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला आराम देऊन त्याच्या जागी शिवम दुबेला संघात घेतले जाऊ शकते.

3. मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीचे पुनरागमन?
जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेला मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती दुखापतीमुळे काही दिवस संघाबाहेर होता. आता तो फिट असल्याने त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – क्रीडा विश्वाला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या पॅरा-ॲथलीट खेळाडूने संपवली जीवनयात्रा

4. अर्शदीपला विश्रांती, मयांक यादवला संधी
भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला आराम देत युवा वेगवान गोलंदाज मयांक यादव याला अंतिम 11 मध्ये उतरवले जाऊ शकते.

मात्र, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे चौथ्या टी-20 सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला विश्रांती दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number