जळगाव हादरलं! भीषण अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा अंत; अवघ्या काही क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Jalgaon Accident
Jalgaon Accident

जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास मालदाभाडी गावाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली ज्यात दुचाकीवर बसलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

हेही वाचा- दोन मुलांना वाऱ्यावर सोडून पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा महिलेल्या भावाचा आरोप

मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन लहान मुलांचा समावेश असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जामनेर तालुक्यातील या भीषण दुर्घटनेने परिसर हादरला असून मृतांची अधिकृत ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबतही अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, ट्रकचालकाची काही चूक होती का आणि दुर्घटनेमागे इतर कोणती कारणे आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेगमर्यादा, वाहतुकीचे नियम आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मन सुन्न करणारी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version