नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरातील म्हसरूळ येथे भयावह घटना घडली आहे. वयोवृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. म्हसरुळ परिसरात असलेल्या गुलमोहर नगर येथे वयोवृद्ध महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार झाला आहे. दिवसाढवळ्या शहरात महिलेचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.