बीडच्या नांदूर हवेली या गावात एक धक्कादायक घटना घडलेली आहे. गरम दूध अंगावर पडून अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. त्याच वेळी कुत्रा जोरात भुंकत तिच्या दिशेने आला. कुत्र्याला पाहून चिमुकलीने घराकडे धाव घेतली. पण घराच्या अंगणात चुलीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. धावत असताना चिमुकलीचा तोल गेला आणि तिचा धक्का थेट दुधाच्या पातेल्याला लागला.
गरम दुधाने भरलेले पातेले हे थेट तिच्या अंगावर पडले. याच दुर्घटनेत चिमुकली गंभीर भाजली. कुटुंबियांनी तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र चिमुकलीच्या प्रकृती गंभीर असल्याने तिला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने नांदूर हवेली या गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.