Sunday, August 17, 2025 05:21:33 PM

पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

महाराष्ट्रात काही उत्तम ठिकाण आहेत जिथे तुम्ही सुद्धा पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता. चला तर पाहूया ही ठिकाणे.

पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी ही आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई: महाराष्ट्र हे निसर्गसौंदर्याने नटलेले राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक साहसी खेळांचा आनंद लुटता येतो. त्यासाठी पर्यटक देशभरातून महाराष्ट्रात येतात. स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, कार्टिंग यासारख्या अनेक साहसी खेळांचा थरारक अनुभव घेता येतो. त्यापैकीच एक म्हणजे पॅराग्लायडिंग. हा एक साहसी आणि रोमांचक खेळ आहे ज्यामध्ये तुम्ही आकाशात मुक्तपणे विहार करू शकता आणि त्यासोबतच, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्रात काही उत्तम ठिकाण आहेत जिथे तुम्ही सुद्धा पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता. चला तर पाहूया ही ठिकाणे. 


1. कोंडेश्वर - लोणावळा:

कोंडेश्वर हे ठिकाण लोणावळ्याजवळील प्रसिद्ध पॅराग्लायडिंग ठिकाणांपैकी एक आहे. येथील उंच डोंगर आणि हिरवेगार निसर्गदृश्य आहे, जिथे तुम्ही उत्कृष्ट पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता. कोंडेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2200 फूट उंचावर आहे. ऑक्टोबर ते मे हा महिना पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. 


2.  पाचगणी - सातारा:

पाचगणी हे ठिकाण सातारा बस स्टॅन्डपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पाचगणीच्या डोंगराळ भागात तुम्ही सुद्धा पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचावर आहे. ऑक्टोबर ते जून हा कालावधी पॅराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम आहे. 


3. कामशेत - लोणावळा:

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पॅराग्लायडिंग स्थळ म्हणून कामशेत प्रसिद्ध आहे. हे ठिकाण पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे याठिकाणी तुम्ही सहजपणे पोहोचू शकता. कामशेत हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2700 फूट उंचावर आहे. ऑक्टोबर ते मे हा कालावधी पॅराग्लायडिंगसाठी योग्य मानला जातो. याठिकाणी पर्यटक शांत निसर्ग आणि  उत्कृष्ट हवेच्या लहरी याचे अनुभव घेऊ शकतात. त्यासोबतच, पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी येथे प्रशिक्षित ट्रेनर्सही उपलब्ध आहेत. 


4. सोलापूर:

सोलापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील दक्षिण - पूर्व भागातील प्रमुख शहर आहे. याठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, झिप - लाईनींग, झोर्बिंग आणि पॅरासेलिंगचा अनुभवदेखील घेऊ शकता. ऑक्टोबर ते मे हा कालावधी पॅराग्लायडिंगसाठी योग्य मानला जातो. 
 


सम्बन्धित सामग्री