रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजी(LPG) गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गॅस लिक होण्यास सुरुवात झाली. यामुळे बाव नदीजवळील घरांना आग लागली. या घटनेमुळे मुंबई- गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस लिक झाल्याने लागलेल्या आगीत दोन गाड्या, एक गोठा जळून खाक झाला आहे. तसेच गॅस टँकर गळती झाल्याने आंब्याची कलम देखील जळून खाक झाली आहेत. लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा : सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर; 10 जून रोजी वितरण सोहळा
एलपीजी गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघातानंतर गॅस लिकची घटना घडली आहे. या अपघातानंतर बाव नदी जवळील घरांना आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झाला. तसेच एलपीजी गॅस टँकर गळती झाल्याने आंब्याची कलम सुद्धा जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.