पुणे : सद्या महिलांवर अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये दिवसानुदिवस वाढ होतांना दिसून येतेय. त्यातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुण्यात एका 26 वर्षीय पुण्यात बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड आवारात ही धक्कादायकी घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. आरोपीने चुकीची माहिती देऊन तरुणीला बसमध्ये आणलंअसल्याचं बोललं जात असून दत्तात्रय गाडे असं संशयित आरोपीचं नाव असल्याची माहिती देखील सूत्रांकडून हाती आलीय. याप्रकरणी पोलिसांची पथकं दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी रवाना झाली असून दत्तात्रय गाडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आलीय. दरम्यान स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
हेही वाचा: Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..
नेमकं काय घडलं?
पहाटे साडे पाच वाजता तरूणी शिवशाहीत बसली
तरुणी स्वारगेटवरून फलटणला जाणार होती
बस दुसरीकडे थांबली असल्याची आरोपीनं बतावणी केली
डेपोतील बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला
तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये घुसला
अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार
आरोपी घटनास्थळावरुन फरार
अत्याचार झालेली तरुणी फलटणला घरी गेली
कुटुंबीयांसोबत येऊन पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली
शिरुर आणि शिक्रापूर पोलीस स्थानकात आरोपीवर गुन्हा दाखल
आरोपीच्या शोधासाठी 8 पोलीस पथकं रवाना
हेही वाचा: नखांवरून समजेल तुम्ही किती वर्ष जगाल
कोण आहे सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे?
दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध घेतला जात आहे. तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे.