दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून मोफत प्रवास विमा योजना उपलब्ध करुन दिली जाते. मात्र, या योजनेता नेमका लाभ कोणाला मिळतो, यासाठीच कोणत्या अटी सध्या लागू आहेत आणि विमा संरक्षण कसे मिळते, याबाबत असंख्य प्रवाशांच्या मनात संभ्रम आहे.
जाणून घ्या योजनेचे नियम
मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व सुविधा खरं तर आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठीच आहे. जर तुम्ही आयआरसीटीसी या अॅप किंवा रेलेव् आरक्षण केंद्रामधून तिकीट बुक करत असताना जर 35 पैशांचा विमा प्रीमियम भरता, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे,बुकिंगच्या वेळी तुमचे तिकीट ही कन्फर्म असणे किंवा आरएसी असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. जर तुमचे रेल्वे तिकीट पूर्मपणे वॅटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळणार नाही.
हेही वाचा – मध्य रेल्वेच्या गोंधळानंतर आजचा दिवस कसा? प्रवाशांचं लक्ष महत्त्वाच्या अपडेटकडे
या योजनेत कोणती अट लागू?
बऱ्याचदा पाहिलं तर एकाच वेळी पीएनआरवर कुटुंबातील अनेक सदस्य प्रवास करत असतात, अशा वेळी एकाच पीएनआरवर काही तिकिटे कन्फर्म कर काही वेटिंग लिस्ट असतात. असाच वेळी ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी असेल, त्याच प्रवाशांना विमा संरक्षण लागू होणार आहे. नियमानुसार पाहिले तर, पीएनआरवरील सर्व प्रवाशांची तिकिटे हे कन्फर्म झाल्यावर सर्व पात्र प्रवाशांना या योजनेचा लाभू मिळू शकतो. मात्र, अत्यंत महत्त्वाचे म्हणजे याही याजनेत एक अट आहे.
रेल्वे अपघातात किती लाख मिळतात?
या विम्याचा लाभ पाच वर्षांखालील मुलांना लागू होणार नाही. कारण यांच्यासाठी स्वतंत्र तिकीट आणि विमा प्रीमियम आकारला जात नाही. जर अपघाताता मृत्यू किंवा प्रवाशाला कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख, आंशिक अपंगत्वास 7.5 लाख आणि उपचारासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची मदत या विम्याअंतर्गत दिली जाणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.